वादग्रस्त आदर्श सोसायटी इमारत घोटाळ्यातील आरोपी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह १३ जणांविरुद्ध काळा पैसा पांढरा करण्यास प्रतिबंध करणार्या ह्यमनी लॉड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज उच्च न्यायालयास सांगितले.
आता केंद्रीय मंत्री असलेल्या विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे या दोन माजी मुख्यमंत्र्यांसह आणखी १५ जणांविरुद्ध याच कायद्यानुसार तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते का याचे प्रतिज्ञापत्र ह्यईडीव ह्यसीबीआयने सादर करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. यामुळे या घोटाळ्य़ाच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढून त्यात आणखी काही राजकीय नेते व सनदी अधिकारी अडकण्याची चिन्हे आहेत.
Leave a Reply