२-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यातील प्रमुख आरोपी या नात्याने गेले १५ महिने तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर माजी दळणवळमंत्री ए. राजा यांना आज येथील विशेष सीबीआय न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. मात्र खटला संपेपर्यंत राजा यांनी तामिळनाडूत जायचे नाही व दळणवळण खात्याला भेट द्यायची नाही, अशा अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला.