फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग अलीकडेच विवाहबद्ध झाला आहे; पण, त्याची सोशल वेबसाईट फेसबुक मात्र लोकांच्या घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत असून, जगातील ३३ टक्के म्हणजेच एक तृतीयांश घटस्फोट फेसबुकमुळे होतात, असा ब्रिटनमधील सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.
ज्या दाम्पत्याचे आपसात पटत नाही, असे तरुण, तरुणी आपल्या जोडीदाराच्या वागणुकीबद्दल फेसबुकवर तक्रारी करतात व नंतर घटस्फोटाच्या अर्जात फेसबुकचा उल्लेख केला जातो. फेसबुकवरील तक्रारीमुळे जोडीदाराला चुकीचा संदेश दिला जातो व घटस्फोटाच्या कारणात महत्त्वाची भर पडते.