मुंबई-पुणे द्रुतगती हायवेवर २७ वर्‍हाडी ठार




Like
Like Love Haha Wow Sad Angry

मुंबई-पुणे द्रुतगती हायवेवर २७ वर्‍हाडी ठार

27 killed
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर धामणी गावाच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. मृतांमध्ये १५ महिला व ७ मुलांचा समावेश आहे. जखमींना पनवेल येथील अष्टविनायक रुग्णालय, पॅनासिया रुग्णालय व पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील येरवडा, लक्ष्मी नगरातील एकनाथ बहुले (२७) आणि घाटकोपर येथील मनीषा गायकवाड यांचा रविवारी मुंबईत विवाह सोहळा आटोपून हे सर्व वर्‍हाडी एमएच-१२-एचबी-३२५, एमएच-१२-एफझेड-८३७८ या दोन ट्रॅव्हल्समधून पुण्याकडे जात असताना ही भीषण दुर्घटना घडली. अपघातानंतर या टेम्पोचा चालक सोमनाथ फडतरे (२५ रा. सातारा) याला अटक करण्यात आली.

असा घडला अपघात…

रविवारी रात्री ११ची वेळ. धामणी गावाजवळ वर्‍हाडाची एक बस पंर झाली. टायर बदलण्यासाठी दोन्ही बस रस्त्याच्या कडेला काही अंतरावर उभ्या. वर्‍हाडीही खाली उतरून दोन्ही बसच्या मध्ये मोकळ्या जागेत गप्पा मारीत बसले. तेवढय़ात भरधाव आलेला टेम्पो मागच्या बसवर आदळला आणि ती बस पुढच्या बसवर धडकली. मध्ये असलेले २७ जण जागीच ठार, तर २६ जखमी झाले.
Source : Online

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




3 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu