१२वीचा कॉपीमुक्त निकाल! |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ७४.४६ टक्के लागला. निकालात मुलींनी मुलांवर मात करीत बाजी मारली आहे. स्थापनेच्या पहिल्याच वर्षी कोकण विभागाने अव्वल निकाल दिला. कॉपीमुक्त अभियानाला यशाची फळे लागल्याचे सुखद चित्र निकालाने समोर आले आहे.या परीक्षेसाठी राज्यातून ११ लाख ४३ हजार १३५ नियमित विद्यार्थी बसले होते. त्यातील ८ लाख ५१ हजार २0६ उत्तीर्ण झाले. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.६६ तर मुलांची ७0.३२ टक्के आहे. मुलांपेक्षा ९.३४ टक्के मुली जास्त पास झाल्या.
गेल्यावर्षी लातूर, औरंगाबाद, अमरावती या विभागांचे निकाल कॉपीमुक्त अभियान राबविल्यामुळे कमी लागले होते. त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष दिले. शिक्षकांनीही अधिक लक्ष दिले. त्यामुळे अमरावतीचा निकाल १४ टक्क्यांनी, औरंगाबाद निकालाचा निकाल ८ टक्क्यांनी तर लातूरचा निकाल १९ टक्क्यांनी वाढला आहे. Source : Online
|