उन्हाळ्यात ही काळजी घ्या.
पृथ्वीला सुर्याची उष्णता ज्या प्रमाणात ज्या काळी मिळते त्यानुसार ऋतू बदलतात. भारतात आपण सहा ऋतु मानतो. सगल्यांच्या आवडत्या वसंत ऋतु मागे ग्रीष्म ऋतु चे आगमन होते. हवामान बदलते, हवेतील ऊष्मा वाढतो. दुपारच्या वेळी घराबाहेर पड़ने ही नकोसे होते. हवामानात ज्याप्रकारे बदल होतात त्याप्रमाणे आपल्या दैनंदिन आहारविहारत बदल केले पाहिजेत. ग्रीष्म ऋतुत म्हणजेच उन्हाळ्यात सुर्याच्या उष्णतेमुळे शरीरातील पाणी घटतो व शरीरात वायुंचा संचय होतो. उन्हाळ्यात आपण थोड्या तरी निष्काळजी पने वागलो तरी वांती, जुलाब, ऊष्मा, मुर्चा वगेरे त्रास होण्याची शक्यता असते. यास्तव ग्रीष्म, ऋतुत वयुचा संचय होणार नाही व वायुनाशक असा आहार विहार करने शरीरस्वास्ताच्या दृष्टीने आत्यंत आवश्यक आहे. ग्रीष्म ऋतूचे आगमन हे शरीरातील रक्तशुद्धीसाठी होते असे मानले जाते. ग्रीष्म ऋतूत उष्णतेमुळे शरीरातून घाम निघतो. घामाच्या द्वारे शरीरातील विष बाहेर फेकले जाते.
निसर्ग व मानव यांचे परस्पर अट्टु असे नाते आहे. निसर्ग हा नेहमी माणसाला हितकर असेच काम करतो. शरीरातून घाम निघतो त्यामुले अस्वस्त वाटते. या उष्ण वातावरनात जी फळे निर्माण होतात ती त्या ऋतूत मानवाला हितकारक अशीच असतात. यास्तव या फळांचे सेवन केले पाहिजे जर आपण ती फळे आपल्या आहारात वापरली नाही तर आपल्या शरीरातील जीवनसत्वे, खानिजांची न्यूनता भासेल. शरीराची रोग प्रतिकारक शक्ति कमी होइल व आपण रोगांचे शिकार होऊ. ग्रीष्म ऋतूत आपली दिनचर्या, आहार-विहार पुढे सांगीतल्याप्रमाने ठेवला तर आपले शरीरस्वास्त चांगले रहू शकते. भात, ज्वारी, गहू, मुग, तुरदाल, मसूर, मटर, कलिंगड, तरबूज, काकडी, उसाचा रस, पुदीना, कांदा, करली, आंबा, लिंबू, चिंच, दुधी, दूध हलके व मधुर असे शीतल पदार्थ खावेत. लिंबू ग्लूकोज मिश्रित सरबत, दह्याची लस्सी, रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात जेवण व निद्रा करावी. दिवसा झाडांच्या शीतल छायेत किंवा खसचे टटे लावलेल्या घरात रहावे. थंड पाण्याने आंघोळ व अल्प प्रमाणात भोजन करावे. जर या नियमांचे पालन केले तर उन्हाळ्यात आपले शारीरस्वास्त चांगले रहू शकते.
ही काळजी घ्या.
ग्रीष्म ऋतूत शरीरात वायुंचा संचय होतो. यास्तव या दिवसात आधिक व्यायाम करू नये. मद्य प्राशन किंवा अशा नशा उत्पन्न करणाऱ्या वस्तूंचे सेवन करू नये. कारन त्याद्वारे शरीरातील आधिक उष्णता, ज्वलन निर्माण होते, मुर्चा येण्याची शक्यता असते. ख़राब झालेली फले, शिळे पधार्थ केंवाही खाऊ नये. असे पदार्थ खाल्ल्याने वांती, जुलाब, होतात. उष्णघात होऊ नये यासाठी उन्हात जास्त घुमु नये. उन्हाळ्यात माशा जास्त प्रमाणात होतात. यास्तव सर्व खान्या-पिण्याच्या वस्तुनित झाकून ठेवाव्यात. माशा बसलेले पधार्थ सेवन करू नये.
ग्रीष्मकालीन रोगांवर उपचार.
ग्रीष्म ऋतूत थोड्याश्या हलगर्जी पणामुळे वांति, जुलाब, ऊष्मा, मुर्चा होण्याची शक्यता असते. जर का असे घडले तर त्यावर पुढील घरघुती उपाय करावेत व नजीकच्या दवाखान्यात जावे. जर अचानक जुलाब झाले तर कापुर अर्क, अमृत धारा वा कॉलरा मिक्श्चर यापैकी कुठलेही एक औषध योग्य प्रमाणात घ्यावे. यापैकी कुठलेही एक औषध उपलब्ध नसेल तर अर्धा लवंगा कुटून त्या अर्धा लिटर पाण्यात टाकून काढा करावा. काढा एक एक चमचा हळूहळू घ्यावा . त्यामुळे वांती ताबडतोब थांबते. तसेच चार मोठ्या वेलच्या घेऊन त्या अर्धा लिटर पाण्यात टाकून काढा करावा. त्यामुळे जुलाब थांबतो. उष्णतेमुळे मुर्चा आली तर तोंडावर थंड पाणी शिंपडावे, नाकात कांद्याच्या रसाचे दोन थेंब टाकावे. त्याचबरोबर ग्लुकोज आणि लिंबाचा रस हळूहळू त्याला प्यायला द्यावे त्यामुळे त्वरित आपण शुद्धीवर येतो.
source :
marathi unlimited