सोया मटार पराठा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Soya Mutter Paratha :

It is a recipe made with the protein rich ingredients . It is a type of paratha and we know all loves parathas specially kids love it. Like aloo paratha and methi paratha this one is also tasty and nutritious.

soya matar paratha food recipes
साहित्य : २५० ग्रांम कणिक, एक वाटी मैदा, दोन डाव तेल, अर्धा चमचा ओवा, मीठ, दोन वाटी सोयाबीनचा चुरा, एक वाटी वाफवलेले मटार, अर्धी वाटी कोथिंबीर, पुदिना हिरव्या मिरचाची  पेस्ट,  एक चमचा अनारदाना, एक चमचा गरम मसाला, तिखट.

कृती :सोयाबीनचा चुरा पाच मिनटे गरम पाण्यात भिजवत घालावा. मटार वाफवून ठेचून घ्यावा. सोय चुरा निथळून मटारमध्ये टाकावा. यामध्ये पुदिना, कोथिंबीर, तिखट, मीठ, मसाला घालून एकत्र करावे. पिठात तेल, मीठ, ओवा घालून ते घट्ट भिजवावे. तासभर ठेवावे. माळून लाट्या करून पुरी लाटावी. त्यात मिश्रण भरून पराठा तुपावर अलगद शेकावा. गरम पराठा, लोणी किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करावा.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर .नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu