आरती स्वामी श्री गजाननाची




Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

श्रीमत सद गुरु जय जय  गणराया \ आपण अवतरला जगी जड जिव ताराया —\\ध्रु \\
ब्रम्ह सनातन जे तू साक्षात् \ स्थावर जंगमि भरला तुम्ही ओतप्रोत \
तव लिलेचा लागे कवना नच अंत \ तुज वर्णाया नुरले शब्दही भाषेत –\\१\\
वरी वरी वेडे पण ते धारण जरी केले \ परी सत स्वरूपा आपुल्या भक्ता दाखविले \
निर्जल गर्दाडासी जल ते आणविले \ विहंग नभिचे काननी आज्ञेत वागविले –\\२\\
दांभिक गोसाव्याते प्रत्यय दावून \ ज्ञानीपनाचा त्याचा हरिला अभिमान \
ओंकारेश्वर क्षेत्री  साक्षात् दर्शन \ नर्मदेचे भक्ता करविले आपण  –\\३\\
अगाध शक्ति ऐसी तव सदगुरुनाथा \ दुस्तरशा भवसागरी तरण्या दे हाता \
वारि सदैव्  अमुची गुरुवर्या चिंता \ दास गणुच्या ठेवा वरद करा माथा –\\४\\

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3




, , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu