\\ आरती मनोबोधाची \\
वेदांचे जें गुह्य शास्त्रांचे जे सार \ प्राकृत शब्दानमाजी केला विस्तार \
कर्म उपासना ज्ञान गम्भीर \ ज्याच्या मनन मात्रे आत्मा गोचर –\\१\\
जयदेव जयदेव जय मनोबोधा \ पंचप्राणे आरती तुज स्वात्म शुध्दा—\\ध्रु \\
दोन शते पांच श्लोक हे जाण \ श्रवणे अर्थे साधक पावती हे खून \\
परमार्थासी सुलभ मार्ग हा पूर्ण \ यशवंत सद्गुरु दासाचा प्राण –\\२\\
………………………………………………………………………………….
\\आरती श्री रामदास स्वामीची \\
ओवालु आरती सद्गुरु रामदास राणा \ पंचही प्रानांचा दीप लाविला जाना –\\ध्रु \\
अज्ञान तिमिर ज्योति सद्गुरु उजळल्या वाती \ ज्ञान बोध प्रगटला तेने प्रकाशली दीप्ती \\१\\
निर्गुण निरंजन ज्योटी सद्गुरु रामदास \ दर्शन मंगलप्रद कल्यानाचा कळस \\२\\