जय देवी जय ओम महालक्ष्मी माते प्रसन्न होवुनी आजही वर दे भक्तांते\\धृ\\
जय अंबे भक्तांच्या श्री महालक्ष्मी आई \ लक्ष्मी व्रत आचरीता भक्तान ऐश्वर्य देई \\१\\
विश्व व्यापक जननी तुज ऐशी नाही \ धावसी भक्ता लागी पावशी लवलाही \\२\\
तुझिया प्रसादे भक्ता लाभे सुखशांती \ आपत्ती चिंता क्लेश सर्वहि ते पळती \\३\\
संकटी तुज वाचोनी कोण रक्षी माते \ पार्थीतो हा भक्त पाव आता जगदंबे \\४\\
हा मालती दत्तात्रेय आरती ओवाळी \ प्रेमे भक्तांसोबत लोटांगण घाली \\५\\