||श्री गजाननाचा काकडा ||
सद गुरु राया गजानना तव काकडा करितो || आतां ||
उद्धारांस्तव बहु आदराने चरणद्वया धरितो ||धृ ||
अज्ञांना ची निशा मावलो कृपा कटाक्षानी |
आशा सटवी टी टी करुनी नाचविते अवनी ||१||
त्या सटवीला आहे आसरा माया मोहाचा
त्याचा टिकाव कधी ना लागे तुज पुढती साचा||२||
षड्रीपु बेटे बेटे खट्याळ मोठे करिती निर्माण |
भ्रम भोवरा जो त्यामध्ये देती आंम्हास टाकून ||३||
त्या भोवर्याला तरून जाया पाय तुझे नौका |
त्या नावें मध्येभक्त बैसती तयास टाकुं नका ||४||
दास गणुची हीच विनंती तुज वारंवार |
सुखे करावे भक्तां आपुल्या लोटु नका दूर ||५||
Source : Marathi Unlimited.