शाहरूख खान याला शुक्रवारी सकाळी न्यूयॉर्क विमानतळावर रोखून त्याची कसून चौकशी करण्यात आली. शाहरूखला लेक्चरसाठी आमंत्रित करणा-या येल विद्यापीठाच्या अधिका-यांना हा प्रकार कळताच त्यांनी इमिग्रेशन आणि कस्टम अधिका-यांशी संपर्क साधला. त्यानंतर शाहरूखची सुटका झाली. या सर्व घटनेमुळे शाहरूख प्रचंड नाराज झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे शाहरूख बरोबर असणा-या सहप्रवाशांना मात्र काही मिनिटांतच सोडून देण्यात आले. दरम्यान, शाहरुखला रोखून त्याची कसून चौकशी केल्याबद्दल अमेरिकेच्या सुरक्षा अधिका-यांनी माफी मागितली आहे.
अमेरिकन सुरक्षा धोरणाने या आधीही असेच पराक्रम केले आहेत. त्यात बराच भारतीय राजकीय नेत्यांबरोबरच अनेक अभीनेत्यांचा सहभाग आहे.
– भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम.
– माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस.
– मल्याळी अभिनेता मामुटीचे आडनाव इस्माईल असल्याने त्याला चौकशीचा सामना करावा लागला होता.
– गायक मुकेश यांचा नातू आणि बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश.
– दक्षिणेतील सुपरस्टार कमल हसन यांची २००२ मध्ये
– इरफान खान याचीही मागील वर्षी चौकशी करण्यात आली होती.
Source : Online Media