भारतासाठी डॉलरची किंमत वाढून रुपयाची किंमत ढासळली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मूल्य वाढून जो डॉलर पहिले ४४ रुपयांना मिळत होता, त्याची किंमत आता ५२ ते ५४ रुपयांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे भारतात सोने आणताना तेवढी जास्त किंमत मोजावी लागत असून, वर अबकारी कराचेही ओझे सोसावे लागत आहे.
‘पु. ना. गाडगीळ’चे पराग गाडगीळ म्हणाले, ‘‘भारताकडून आयात केल्या जाणार्या मालात वाढ झाल्याने डॉलरची मागणी वाढली आहे. त्यामुळे हे दर वाढले आहेत. यामुळे सध्या उच्चांकी भाव सोने गाठत असल्याने सोनेखरेदी आता फारच कमी होईल.’’