रिझर्व्ह बँकेने आज वार्षिक पतधोरणाच्या माध्यमातून रेपो रेटमध्ये अर्धा टक्का कपात करत नव्या आर्थिक वर्षांत जनतेला खुशखबर दिली आहे. यामुळे गृह, वाहन यासह विविध कर्जांवरील व्याजदरात अर्धा टक्का कपात होत ही कर्ज स्वस्त होणार आहेत. याचा प्रामुख्याने फायदा नव्या कर्जदारांना आणि ज्यांची सध्या कर्जफेड सुरू आहे, अशा दोन्ही वर्गातील लोकांना होईल. जानेवारी २00९ नंतर प्रथमच इतकी मोठी कपात शिखर बँकेने केली असून, रेपो रेट आता ८.५ टक्क्यांवरून ८ टक्के इतका झाला आहे.