ख्रिस्ती धर्मातील अत्यंत पवित्र व महत्त्वाचा दिवस असणार्या गुड फ्रायडेनिमित्ताने आज ख्रिस्ती बांधवांनी प्रभू येशूचे स्मरण करत त्यांना आदरांजली अर्पण केली. मुंबईतील विविध चर्चमध्ये आज ख्रिस्ती बांधवांची गर्दी झाली होती. ठिकठिकाणी प्रार्थनासभाही आयोजित करण्यात आल्या होत्या.
गुड फ्रायडेला रोमन गव्हर्नर पिलाता याच्या हुकमावरून येशू ख्रिस्ताला गुन्हेगाराप्रमाणे दोन चोरांच्या मध्ये क्रूसावर चढवण्यात आले. प्रभू येशूने तीन तास मरणयातना सहन केल्यानंतर त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. या काळात त्यांनी सात वाक्ये उच्चारली. त्यामुळे या दिवशी ख्रिस्ती बांधवांनी एकत्र जमून येशूने भोगलेल्या मरणयातनांचे भक्तिभावाने स्मरण केले आणि या पवित्र सात वाक्यांचे मननही केले.
Source : Yahoo