Potato Gulabjamun :
If you like to prepare something different then we have one recipe for you. Try this potato gulabjamun made with boiled potato, ghee, refined oil, milk, soda and sugar. This recipe looks like simple gulabjamun but it is different.
बटाट्याचे गुलाबजामून
जर तुम्हाला काही वेगळे करायचे असेल तर बटाट्याचे गुलाबजामून करून बघा. अतिशय उत्तम आणि खायला सुरेख असे बटाट्याचे गुलाबजामून.
साहित्य : चार मध्यम आकाराचे बटाटे. एक चिमुट सोडा. एक टेबलस्पून साजूक तूप, एक कप दुध, तळन्याकारता रीफिंड तेल, दोन वाट्या साखर.
कृती :
प्रथमतः बटाटे उकळून, सोलून घ्यावेत. नंतर त्याचा गोळा तयार करावा. हा गोळा तुपावर परतत असतांना त्यात थोडे – थोडे दुध घालावे. गोळा मऊ मुलायम झाला की त्यात सोडा आणि रवा घालून चांगले माळून घ्यावे. यानंतर लगेचच गुलाबजाम वळावेत. हे गुलाबजाम रीफिंडतेलात तळावेत. त्यानंतर दोन वाट्या साखरेत दोन वाट्या पाणी आणि आवश्यक त्या प्रमाणात वेलची पावडर घालून पाक करावा. त्या पाकात गुलाबजाम टाकावेत. पाकात मुरल्यानंतर हे गुलाबजाम छान लागतात. सण – समरामभात एक वेगळा पदार्थ सर्व करता येतो.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९