पापडी चिप्स




Papdi Chips :

Thin, Light, Savory, Crisp chips made from all purpose flour, rice flour and fried with oil. you can use only whole wheat flour or all purpose flour/maida to make the papdis.

पापडी चिप्स :- लहान मुलांना नेहमीच काहीतरी सटरपटर खायला हवे असते. त्यांच्यासाठी हा चटपटीत पदार्थ.

साहित्य :-  एक वाटी कणिक, एक वाटी मेदा, दिड वाटी तूप, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी दही, चिंच, गुळ, धने, जिरे आणि मिरी पावडर, चवी पुरते मीठ दोन ते  तीन मिरच्या.

Papdi Chips

कृती :- कणिक आणि मैदा तेलाच्या हाताने मळून भिजुउन ठेवावा. चिंच, गुळ कोळून उकळून घावे. चिंचेचा चोथा गाळून बाजूला करावा. चिंच-गुळाच्या पाण्यामध्ये मिरच्या चिरून वा वाटून घालाव्यात.त्यामध्ये जिरे, धने, मिरी यांची पावडर मिसळावी आणि ही चटणी बाउल मध्ये भरून ठेवावी. नंतर कणकेचे बारीक गोळे करून पातळ लाटावे. त्यांचे उभे तुकडे करावेत. त्या नंतर तळावे. बटाट्याचे पातळ काप करून तेही तळावेत. या तळलेल्या पापडी वर आणि बटाट्याच्या चिप्सवर दही घालावे. चवीला मीठ घालावे आणि वर चटणी पसरावी. हे पापडी चिप्स खायला रुचकर आणि स्वादिष्ट लागतात.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर.

नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड