Panner Pakode :
Paneer pakode is popular pakode which is crispy from outside and soft from inside. Paneer is the main ingredient for this recipe. We can serve it as a breakfast or with a cup of tea also. If you are fond of pakoras then try other recipes too.
घरात पाहुणे मंडळी आली असल्यास आमरसाच्या जेवणाबरोबर काहीतरी खमंग आणि खुसखुशीत पदार्थ हवाच! अशा वेळी पनीर पाकोद्यासारखा पदार्थ केल्यास जेवणाची लज्जत आणखी वाढते.
साहित्य : पाव किलो पनीर, गरम मसाला, तिखट, लिंबू, डाळीचे पीठ, दोन चमचे तांदळाचे पीठ, मीठ, पाव चमचा बेकिंग पावडर.
कृती : पनीर स्वच्छ धुवून घ्यावे. त्याचे लांबट आकाराचे तुकडे करावे. त्या तुकड्यांना लिंबाचा रस, गरम मसाला, तिखट, मीठ चोळून अर्धा तास ठेवावे, डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ आणि बेकिंग पावडर व्यवस्तीत एकत्र करून त्यात मीठ, हळद, तिखट घालून पाणी घालावे, सरबरीत म्हणजेच भाजाच्या पिठापेक्ष्या किंचित पातळ पीठ भिजवावे, त्यात पनीरचे तुकडे बुडवून गरम तेलात टाळून घ्यावेत , टोम्यतो सोसबरोबर गरम पकोडे सर्व करावे.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९
1 Comment. Leave new
chan….