सभागृहात गणपतीची आरती केल्यानंतर वर्षभरासाठी निलंबित झालेल्या शिवसेनेच्या १३ आणि भाजपाच्या एका आमदाराचे निलंबन मागे घेण्याची मागणी शिवसेना आणि भाजपाच्या वतीने आज विधानसभेत करण्यात आली आणि मनसेनेही त्यास साथ दिली. एक वर्षाचे निलंबन ही घोर शिक्षा आहे, ती मागे घ्या, असे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर म्हणाले. या आमदारांचे निलंबन एक आठवड्याच्या आत मागे घेण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.
आमदारांचे निलंबन म्हणजे त्यांना जनतेच्या कामांपासून वंचित ठेवणे आहे. त्यांना वर्षभर निलंबित ठेवणे हा मतदारांवर अन्याय होईल.
-बाळा नांदगावकर