Mewa Wati :
Mewa wati is a sweet dish with semolina, mewa, baking powder, grind sugar, cashew nuts, almond nuts, pista and other dry fruits. Rose essence can be used in this dish.
साहित्य : – दोन वाट्या मिल्क पावडर, तीन टेबल स्पून पातळ तूप, अर्धी वाटी बारीक रवा, पावूनटेबलस्पून बेकिंग पावडर तळण्यासाठी तूप सारणासाठी काजू-पिस्ते -बदाम प्रत्येकी एक वाटी.
कृती :- प्रथम रवा पाण्यात घट्ट भिजवावा. चार पाच घंटे तसाच ठेवावा सुका मेवा जाडसर वाटून त्यात थोडी पिठी साखर आणि पातळ तूप घालून त्याचे हरबरयाच्या आकाराचे गोळे करावे. दुध पावडर मध्ये बेकिंग पावडर मिसळून त्याला पातळ तूप चोळावे नंतर भिजवलेल्या रव्याचा गोळा त्यात घालावा. दह्याच्या हाताने मिश्रण सारखे करावे पोळीच्या कणके प्रमाणे सैल करावे हे मिश्रण पाच मिनिट तसेच ठेऊन तुपाच्या हाताने सुपारी एवढे गोळे करावे. त्याला गोल वाटीचा आकार देऊन त्यात सुका मेव्याची गोळी टाकावी आणि वरून तोंड बंद करावे. नंतर साखरेचा एकतारी पाक करावा. तयार केलेले गोळे तुपात तळून एकाच वेळी पाकात घालावे आवड असल्यास त्यात रोझ इसेन्स घालावे..
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९