Mango Rolls :
Prepare something different and delicious in summer for the guests. Mango rolls is really very good in taste and very usefull in summer days. Enjoy summer with this simple and sweet dish.
साहित्य :- आंब्याचा रस दोन वाट्या, बदाम पिस्त्याचे काप एक चमचा, पिठी साखर दोन चमचे, खवा चारचमचे, चांदी वर्क.
कृती :- आंब्याचा रस नॉनस्टिक प्यानवर घालून मंद आचेवर जाळीदार डोसा तयार करून घ्या किंवा मायक्रोव्हेव्च्या काचेला तेल लाऊन त्यात दहा मिनटे पसरून ठेवल्यास सुद्धा छान जाळीदार होतो.नंतर यावर खवा, सुका मेव्याचे काप, पिठी साखर, घालून चाकूच्या साह्याने लांब पट्ट्या कापून प्रत्येक पट्टीची गुंडाळी करा सुरळीच्या वड्या सारखे त्यावर चांदी वर्क
लाऊन सर्व्ह करा.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९