शेषाचल-अवतार तारक तू देवा \ सुरवर मुनिजन भावे करिती तव सेवा \
कमला रमणा अससी अगणित गुण ठेवा \ कमलाक्षा मज रक्षी सत्वर वर द्यावा –\\१\\
जयदेव जयदेव जय व्यंकटेशा \केवळ करुणा सिंधू पुरविसी आशा –\\धृ\\
हे नीज वैकुंठ म्हणुनी ध्यातो मी तूंते \ दाखविसी गुण कैसे सकळीक लोकांते \
देखुनी तुझे स्वरूप सुख अदभुत होते \ ध्यातां तुजला श्रीपती धृढ मानस होते –\\२\\–जयदेव
1 Comment. Leave new
thanks for sharing