त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा \ त्रिगुणी अवतार त्रैलोकि राणा \
नेतिनेती शब्द न ये अनुमाना \ अखंड समाधी ध्याती योगी मुनिजना \
जयदेव जयदेव जय श्री गुरुद्त्ता \ आरती ओवाळीता हरली भवचिंता \जयदेव जयदेव –\\१ \\ धृ \\
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त \ अभाग्यासी कैसी कळेल हि मात \\
पराही परतली तेने कैसां हा हेत \ जन्म मरणाचा पुरलासे अंत \\जयदेव जयदेव –\\२\\
दत्त येवूनिया उभा ठाकला साष्ठागे नमुनी प्रणिपात केला \\
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला \ जन्म मरणाचा फेरा हा चुकविला –\\जयदेव जयदेव \\३\\
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान \ हरपले मन झाले उन्मन \\
मी तू पणाची झाली बोळवण \ एका जनार्दनी श्री दत्त जाण–\\जयदेव जयदेव \\४\\
श्री दत्ता चे सोळा अवतार
१) योगीराज २) अत्रिवरद ३) दत्तात्रेय ४) योगी जनवल्ल्भ ५) लीला विश्वंभर ६) सिद्धराज
७) ज्ञानसागर ८) विश्वंभर ९) मायारूप १०) मायामुक्त ११) आदिगुरु १३) देवदेव १४) दिगंबर १५) कृष्णश्याम १६) कमलनयन.
श्री दत्तां चे गुरु
नाव …………….गुण
पृथ्वी…………….सहिष्णुता, परोपकार.
आकाश ………….अनासक्ती .
पाणी ……………..मधुरता, तृष्णा निवारण,सर्वांना जीवन, वाफ, ढग.
सूर्य ……………… प्रकाश, अविश्रांम काम, उष्णता, पाण्याची वाफ,पाऊस.
अग्नी ……………तेज, घाणीचा नाश.
मासा ……………पाण्यावर संयम.
समुद्र ……………विशाल दृष्ठी, सम भाव.
कोळी …………… नाजूक विणकाम.{ जाळे}
वृक्ष ……………..सर्वांना सारखीच सावली देणारा.
लोहार…………….एकाग्रता.
कुत्रा ……………… ईमानदारी
शेतकरी …………सतत कष्ठ.
संत ………………परोपकार.
मधमाशी………..संग्रहिवृती.
मुंगी………………संग्रहीवृत्ती.
चंद्र ………………शीतलता.
………………………………………… श्री गुरु चरीत्रातून