रहा एव्हर फ्रेश
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Here its a tips on How to live happy and energetic. please read this tips for living healthy and energetic.
tips on how to live happy and energetic आजची स्वप्न आणि उद्याचे सत्य यात एकाच अडथला असतो असे  म्हणतात. हा अडथला म्हणजे कंटाळा. सगळीच माणसे आळशी  किंवा कंटाळवाणी नसतात, हे खरे असले तरी बरेचदा गोष्टी वेळेच्या  वेळी मार्गी न लागल्यामुळे कामात घोटाळे होतात. नुसते बसून  राहिल्याने अधिक कंटाळा येतो तसेच एकाच प्रकारचे काम सतत  करत राहिल्याने कंटाळा येतो. हल्लीच्या स्पर्धेच्या युगात २४ तासांचा  दिवसही कमी पडतो. मग कंटाळा आला तरी काम सोडून कसे  चालेल? असा प्रश्नही पडतो. सतत कार्यरत असणाऱ्या ७५ वर्षच्या  तुडतुडीत आजीबाई म्हणतात. मला नाही बसून किंवा झोपून  राहायला आवडत. एका कामाचा कंटाळा आला तर ते बाजूला सारून  दुसरे काम करावे. कामात बदल म्हणजेच विश्रांती हेच माझे सूत्र आहे.  आजीबाईचे अनुभवसिद्ध सूत्र हे विद्यानसिद्ध आहेच. हे त्यांना  कदाचित माहिती नसेल.

एका जागी शांत बसायला शिक आणि ओरड प्रत्येकाने बालवयात एकली असते. याचाच अर्थ जोवर आपण स्थिर बसलेले असतो तोवर विचार स्थिर असतात. आपण हललो कि विचारही हलतात. हेच सूत्र वापरून कंटाळ्याला लांब पालवता येते. एकाच प्रकारचे काम करून कंटाळा आला आणि कामाची गती मंदावली तर पटकन एक गोष्ट करायची. हात- पाय  एकदम ताणायचे अन एकदम सैल सोडायचे. त्यामुळे शरीरातील उर्जा एकदम सळसळते. हा अनुभव जाणिवेने घेवून बघा शरीराला खूप आळोखे – पिळोखे देवून तोंडाने विचित्र आवाज करीत आळस देणाऱ्या व्यक्तीचे सिक्रेट आता तुमच्या लक्षात येईल.

स्वस्थ बसलेल्या शरीरातील उर्जा अशी चाळवल्यावर दोन-तीन मिनटे दीर्घ स्वस घ्या अन सोडा. हा मेंदूतील विचारशक्तीला चालना देण्याचा व्यायाम आहे. आवर्जून दीर्घस्वसन करताना लक्षात येते की आपण एरवी किती अपुरा स्वास घेतो. दीर्घयुशी ऋषी-मुनीच्या आरोग्याचे रहस्य प्रनायामातच दडलेले होते. आपण निदान रिचार्ज होण्यापुरता तरी या तंत्राचा उपयोग, करून घ्यायला हवा. या तंत्राचा वापर करून आपण शरीरातील उर्जा भरून काढू शकतो. त्या द्वारे अधिक काळ ताजेतवाने राहू शकतो.

source :
Marathi unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu