गुजरातमध्ये २00२ मध्ये गोधरा कांडानंतर राज्यभर उफाळलेल्या भीषण जातीय दंगलीशी संबंधित आणंदमधील ओड गावातील सामूहिक हत्याकांड प्रकरणात येथील सत्र न्यायालयाने २३ आरोपींना दोषी ठरविले तर तेवढय़ाच आरोपींची पुराव्याअभावी सुटका केली. दोषींना उद्या शिक्षा सुनावली जाईल. १ मार्च २00२ – १५00 लोकांच्या जमावाने ओड गावात अल्पसंख्याक समाजातील महिला व मुलांसह २३ लोकांना जिवंत जाळले.
ओड येथील नरसंहार हा सुनियोजित कटाचा भाग होता, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. न्यायालयाने हा गुन्हा ‘दुर्मीळात दुर्मीळ’ म्हणून विचारात घेतला असल्याचे सरकारी वकील पी.एन.परमार यांनी सांगितले.