दास गणु कृत || गजानन माहाराजाष्टक ||
गजानना गुणागरा परम मंगला पावना | अशीचं अवघे हरी, दुरित तेवी दुर्वासना |
नसे त्रिभुवना मध्ये तुज विन आम्हा आसरा | करी पदनता वरी दया न रोषा धरा||
निरालसपणे नसे घडली अल्प सेवा करी | तुझी पतित पावना भटकलो वृथा भूवरी |
विसंबत न गाय ती आपुलिया कधी वासरा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ||
आलास जगी लावण्या परतुनी सुर्हाटे जन | समर्थ गुरुराज ज्या भुषवी नाम नारायण |
म्हणून तून प्रार्थना सतत जोडूनिया करा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ||
क्षणात जल आणिलेनसून थेंब त्या व्यापिला | क्षणात गमनाप्रती करिती ईच्छीलेल्या स्थलां|
क्षणात स्वरूपे किती विविध धारीसी धीवरा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ||
अगाध करणी तुझी गुरूवरा न लोकां कळे |तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरीतात नाना खुले |
कृपा उदक मागता त्यजुनी गौतमीच्या तीरा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ||
समर्थ स्वरूपा प्रती धरून साच बालापुरी |तुम्ही प्रगत जाहला सुशील बालकृष्ण घरी |
हरीस्वरूप घेउनी दिधली भेट भीमातिरा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ||
सच्छीनद्र नौके प्रती त्वदिय पाय हे लागता | जळात बुडता तरी तिजसी नर्मदा हे हाता |
आशा तुजशी वाणण्या नच समर्थ माझी गिरा |करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ||
आता न ब हु बोलता तवं पदांबुजा वंदितो | पडो विसर न कडा मदीय हेंच मी मागतो |
तुम्ही वरदआपुला कर धरा गणुच्या शिरा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ||
Source : Marathi Unlimited.