भाडे नाकारणे आता मुजोर रिक्षाचालकांना चांगलेच महागात पडू शकते. आता ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणार्या रिक्षाचालकांकडून आता ६00 ऐवजी ११00 रुपये म्हणजेच दुप्पट दंड वसूल करण्याचा निर्णय कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीच्या धोरणाला रिक्षाचालकांकडून नेहमीच विरोध होत असतो. मनमानी भाडे आकारणे, जवळच्या व लांब पल्ल्यांचा बहाणा करीत भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तणूक हा काही रिक्षाचालकांचा दैनिक शिरस्ताच झाला आहे. अशा रिक्षाचालकांच्या अरेरावीला लगाम घालण्यासाठी भाडेदराच्या निश्चितीसाठी सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती केल्यानंतर आता ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणार्या रिक्षाचालकांच्या आधीच्या असलेला दंडाच्या रकमेत एकप्रकारे दुपटीने वाढ करीत पुन्हा एकदा उपप्रादेशिक परिवहन विभागाने ग्राहकाभिमुख निर्णय घेतला आहे.