देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग आज भूकंपाने हादरला. सकाळी १0 वाजून ५८ मिनिटांनी झालेला हा भूकंप ५ रिश्टर स्केलचा होता. त्याची कंपणे कमीजास्त प्रमाणात राज्यभर जाणवल्याची माहिती, वेधशाळेच्या सूत्रांनी दिली. या धक्क्यांमुळे मध्य आणि दक्षिण मुंबई परिसरात काही ठिकाणी स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. गिरगाव येथील अनेक चाळी जुन्या असल्याने वरच्या मजल्यावरील रहिवाशांनी मोकळ्य़ा जागेत धाव घेतली. मुंबईत भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.