अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अँपलचा रेटिना डिस्प्ले असलेला नवा आयपॅड येत्या २७ एप्रिल रोजी भारतात विक्रीस उपलब्ध होणार आहे. नव्या आयपॅडमध्ये रेटिना डिस्प्लेमुळे चित्र अधिक चांगले दिसेल. त्यात ५ मेगापिक्सल कॅमेरा व १0८0 पी एचडी व्हीडिओ शुटींगही करता येते. या नव्या आयपॅडची बॅटरी तब्बल १0 तास चालते. तो सर्वांत स्लीमही आहे.