आरती रामदासा भक्त विरक्त ईशा | उगवला ज्ञानसूर्य उजळोनि प्रकाशा ||धृ||
साक्षात शंकराचा अवतार मारुती | कलिमाजी तेचि झाली रामदासाची मूर्ती ||१||
वीसही दशकांचा दासबोध ग्रंथ केला | जडजीवा उद्धरिले नृप शिवासी तारियेले ||२||
ब्रह्म चर्य व्रत ज्याचे रामरूपी सृष्ठी पाहे | ”कल्याण,, तीही लोकीं समर्थ सद्गुरूपाय ||३|| आरती रामदासा ….