आरती हरितालिका मातेची
Like
Like Love Haha Wow Sad Angry

haritalika matechi aartiजयदेवी हरितालिके \सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके \\धृ\\
हर अर्धांगी वससी जासी यज्ञा माहेराशी  \

तेथे अपमान पावसी \यज्ञकुंडी गुप्त होसी \\जय \\–१
रिघसी हिमानद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी \ उग्र तपश्चर्या मोठी \

आचरसी उठाउठी \\जय \\ २
ताप पंचाग्नि साधने \ धुम्र पान अधोवदने \

केली बहु उपोषणे \ शंभू भ्रतारा कारणे \\जय \\–३
लीला दाखविसी दृष्ठी \हे व्रत करिसी लोकांसाठी \

पुन्हा वरिसी धूर्जटी \ मन रक्षावे संकटी \\जय\\ –४
काय वर्णू तव गुण \  अल्पमती नारायण \

माते दाखवी चरण \ चुकवावे जन्म मरण \\जय \\–५

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu