14
जयदेव जयदेव जय श्री हनुमंता | तुमचेनि प्रसादे न भिये कृतांता ||धृ ||
सत्राने उड्डाणे, हुंकार वदनी | करी डळमळ भुमंडळ सिंधू जळ गगनी ||
कडा डिले ब्रम्हांड धोका त्रिभुवनी | सुरवर, नर,निशाचर त्यां झाल्या पळणी ||जयदेव||१||
दुमदुमिले पाताळ उठिला पड शब्द | धगधगिला धरणीधर मानिला खेद ||
कडा डिले पर्वत उ डुगण उच्छेद | रामिरामदासा शक्तीचा शोध || जयदेव ||२||
14