|| आरती गीता मातेची ||
सुख करणी दुख हरिणी जननी वेदाची | अगाध महिमा तुझा नेणे विरंची ||
ते तुं ब्रम्ही होतीस लीन ठायीची | अर्जुनाचे भाग्या प्रगट मोक्षीनची –||१||
जय देवी जयदेवी जय भगवत गीते | आरती ओवाळू तुज वेद माते—-||धृ ||
सात शतें श्लोक व्यासोक्तिं सार | अष्ठादश अध्याये ईतुका विस्तार||
एक अर्ध पाद श्लोक उच्चांर | करिती भावे त्यांचा निरसे संसार –||जय||
काय तुझा पार नेणे मी दिन | अनन्य भावे आलो तुजला शरण ||
सनाथ करी ओ माते कृपा करून | बापरखुमादेवी वरदा अभिमान–||जय ||