आरती अन्नपूर्णा माताची
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

anna purna mata ke pictures

 

श्री अन्नपूर्णा देवी जयजय जगदंबे जननी  |
तुज  ऐसी देवता नाही कोणी त्रिभुवनी |—-||धृ ||
विप्र धनजय त्याची भार्या सुलक्षणा होती  |
ती दोघे हि अनन्य भावे तव  भक्ती करिती |
तुझ्या प्रसादे त्यांना झाली पुताची प्राप्ती  |
सुख शांती लाभली देवी ऐसी तव कीर्ती  |—||१||
नर देहाचे सार्थक होते तव पूजन  करुनी  |
नाम स्मरणे सकलही जाती भव सागर तरुणी |
जीवन जरी  हे भरले आहे व्याधी उपाघिनी |
प्रसन्न परी तू होता सारे भय जाते पळूनी  |—–||२||
छंद मनाला तुझा लागला मी करिते धावा |
धावुनी ये देवते पाहुनी मम भक्ती भावा  |
अखंड शाश्वत प्रेम सुखाचा दे मजला ठेवा |
जन्म मृत्यूचा फेरा चूकवी ठाव पदी द्यावा |—-||३||
तू माझी माउली अजाण मी बालक तव तान्हा |
क्षमस्व माते अपराधांची किती करू गणना |
अन्न वस्त्र दे वैभव सारे सुख भोग हि नाना |
आम्ही सर्वही करू प्रार्थना वंदुनी तव चरणा |—||४||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d