आई-तू-अपडेट राहा!
Like
Like Love Haha Wow Sad Angry

aai tu update raha for marathi articles…

 आई -तू – अपडेट राहा!mother should need proper information आई  हीना रब्ब्नी खारयांच्या कडे असलेले खाते  पाकिस्तान सरकार  काढून घेनार हे काही मला पटत. नाही यावर तुझ  काय मत आहे, असा  प्रश्न  पंधरा वर्षाचा मुलगा विचारतो तेव्हा  त्यावर  बोलावच लागत आणि  बोलायचं म्हटल तर, अपडेट हीं रहाव लागत. मला  चांगल आठवत. मी  जेव्हा पंधरा वर्षाची होते. तेव्हा मला माझे बाबा  दूरदर्शन जवळ  बसवायचे. आणि बातम्या पहायला लावायचे तेव्हां  दूरदर्शन म्हणजे चित्रहार, रामायण, बातम्या– वैगरे बघायचा जम  कंटाला यायचा वडील जनरल  नॉंलेजसाठी ओरडत असायचे आणि माझे  या कानातून आले वारे…..

अस व्हायचं, पण जी टाळा टाळ मी माझ्या तरून पणत केली ती    टाळाटाळ  करण्याची मुभा मला माझा मुलगा देत नाही. तिसरी चौथी    पासूनच त्याला वर्तमानपत्र वाचण्याची सवय लागली. गेल्या दोन वर्षा  पासून तर तो कोणत्याही विषयावर आपले मत व्यक्त करतो. आपल्या बाबांशी अक्षरश: चर्चा करतो. याचर्चेत आई कां सहभागी नसते असी त्याची तक्रार असते. गरज नसतानाहीं मी उगाचच काम करत राहिले की आई त्यापेक्षा वर्तमानपत्र वाच. आणि मालिका बघत असले की म्हणायचा आई त्यापेक्षा  बातम्या पहा. सुरवातीला  मी त्याचे बोलणे जास्त मनावर घ्यायचे नाही. पण नंतर मात्र तो हट्टच  करायला लागला, बरोबर असो की चूक, “आई तुला तुझ मत असायलाच हव” याबाबत  त्याचं आणि त्याचा  बाबांचं एकमत झाल तेंव्हा मला बदलन भाग पडल. काही गोष्टी  बदलून, आळस झटकून मीही आजूबाजूला घडणाऱ्या  घडामोडी बाबत  ”अपडेट रहायला लागले” आता विषय कोणताही असो मला माझ मत व्यक्त करता येत. माझ्या छोट्याशा  मुलाने  माझ्यामध्ये  अभिव्यक्त  होण्याची  गरज निर्माण केली. सभोवतालच्या जगाबाबत अद्ययावत राहण्यातल समाधान, काय आहे याचा अनुभव मी घेत आहे आपल्या आई ला खूप काही माहित असत याचा त्यांच्या मुलाला खुप आनंद आहे उशिरा कां होईना त्याच्या  मुलामुळे  त्यांचात  बदल झाला  आपल्याला  वाटत; की मुलांना आपणच  शिकवू शकतो पण खर्च आपली मुलही आपल्याला खूप काही शिकवू शकतात नव्हे.. शिकवत असतात —- अश्या व्यक्तिमत्वाची मुले असल्यास त्यां पासून बोध  घायला हवा.

लेख: प्रणीता

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu