सिनेस्टार जिथे आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी इतरांचे केस कापताना दिसतात तिथे मराठी कलाकारांनी सिनेमातील भूमिकेशी एकरूप होऊन आपल्या वाट्याला आलेली व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे पडद्यावर सजीव करण्यासाठी मुंडन केले आहे.
ग्रेट मराठा एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘काकस्पर्श’ या आगामी सिनेमासाठी मराठीतील आघाडीच्या कलाकारांसह एकूण २८ जणांनी गोटा करून घेतला आहे. ‘काकस्पर्श’चे लेखन गिरीश जोशींनी केले असून १९३0 ते १९५५ मधील कालखंडातील ही कथा आहे.
Source : Yahoo