उघड्यावरी माझे आयुष्य सर्व गेले

Like Like Love Haha Wow Sad Angry 1 उघड्यावरी माझे आयुष्य सर्व गेले आता कशास तुम्ही हे वस्त्र पांघरले ?...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

life and struggle

उघड्यावरी माझे आयुष्य सर्व गेले
आता कशास तुम्ही हे वस्त्र पांघरले ?
तुडवीत मरणवाटा आलो स्वतः स्मशानी
आधीच पेटलो मी देता कशास अग्नी ?
गंगोदके कशाला ? डोळ्यातच खूप पाणी
त्यानेच स्नान घाला , मी ठेविले जपुनी .
संस्कार मर्तिकांचे करता उगाच कशाला ?
माझ्याच कातडीचे मलाच पांघरून घाला .
होतो कधी मी तुमचा म्हणुनी उगाच टाहो
शोधा अजून कोणी , खांदा त्यास द्या हो ….

प्रणव वानखेडे

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Related Stories