2
देखिली तुळजा माता निवालो अंतरी सुख \ तुटली सर्वही चिंता घोर आधार वाटला\\१\\
आघात संकटे वारी निवारी दुष्ठ दुर्जना \संकटी भर्वसा मोठा तत्काळ काम होत अस\\२\\
सर्वही बालके जिची त्रीलोक्य जननी पहा \ साक्षिणी सर्व लोभाळू मर्यादा कोण रे करी\\३\\
सर्वांची मुळ हे माया \ मुळ माया म्हणोनिया \राम उपासना आहे हे राम वरदायिनी\\४\\
सख्य ते चालते सवे प्रवृत्ती निवृत्ती कडे \ शक्तीने मिळती राज्ये \युक्तीने तिकटी सये\\५\\
शक्ती युक्ती आम्हा देणे श्री राम वरदायिनी श्री राम वरदायिनी\\६\\
\\श्री समर्थ रामदास कृत \\
2