31
उठाउठ हो सदगुरुराया सरली ती राती ||दयाळा||
उष:कालचा वाहे वारा कुक्कुट ओरडती ||धृ ||
सूर्य सारथी अरुणा पाहुनी प्राची नीजचित्ती |
गेली होऊनी अति आनंदित ते मी वानुं किती ||१||
उलूक पिंगळे झाले भयाभीत पाहुनी अरुणाला |
प्राची प्रांत तो सदगुरुराया लाली लाल झाला ||२||
चक्र वाक चंडोल पक्षी ते प्रभात कालाला |
सूर्य बघण्या आतुर होऊनी घालिती घिरट्याला ||३||
तेंवी बघण्या तुला पातले भक्त तुझे द्वारी |
दर्शन देवूनी तयास तारा गणु म्हणे संसारी ||४||
* दास गणु कृतं
31