सचिन रमेश तेंडुलकर




Like
Like Love Haha Wow Sad Angry

सचिन रमेश तेंडुलकर हे समीकरण थोड वेगळच आहे.  तुम्हीं लहानपणापासूनच या दोन्ही गोष्टी बघत आहात. सचिन लहानपनापासूनच क्रिकेट खेळतो. त्याची क्रिकेटची शैली कर वेगळीच आहे. सचिन सारखा दुसरा क्रिकेटर तुम्हाला कदाचितच मिळेल. त्याचा जन्मच मुळी विक्रमांसाठी झाला आहे. विक्रमांची अनेक शिखरे, धावांच्या राशी उभारल्यावरही सचिनची भूक अद्याप शमलेली नाही. कसोटी क्रिकेटमधील ५१ शतकांपैकी २०वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर २० सामने अनिर्णीत राखले आहेत आणि पराभव आहेत फक्त ११. याचप्रमाणे एकदिवसीय क्रिकेटमधील ४८ शतकांपैकी ३३ वेळा भारत जिंकला आहे, तर फक्त १३वेळा भारत हरला आहे. तथापि, इंग्लंडविरुद्धची विश्वचषक स्पध्रेतील लढत भारताने ‘टाय’ राखली होती. गमतीची गोष्ट म्हणजे त्या सामन्यातही सचिनच्या नावावर शतक होते. . आता ३८ वर्षीय सचिनच्या क्रिकेट कारकीर्दीलाही २२ वष्रे पूर्ण झाली आहेत. भारतीय क्रिकेटची इतकी वष्रे निस्सीम सेवा करणाऱ्या या दैवताने अनेक सुवर्णक्षणांचा नजराणा क्रिकेटरसिकांना पेश केला आहे. त्यामुळेच २ एप्रिल २०११ला भारताने जगज्जेतेपद जिंकले, तेव्हा टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू हेच म्हणत होता की, ‘हे विश्वविजेतेपद सचिनला समर्पित!’ क्रिकेटबद्दलची निष्ठा आणि अब्जावधी क्रिकेटरसिकांच्या अपेक्षांचे ओझे सचिन आजही तितक्याच दुर्दम्य आत्मविश्वासाने पेलवतो आहे. १९९०मध्ये इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सचिनने क्रिकेट कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. मग शतकांमागून शतकांनी देशोदेशीची मैदाने त्याने गाजवली. सचिनने शतक झळकावले नाही, असा एकमेव देश म्हणजे झिम्बाब्वे. ११ ऑक्टोबर २०१०ला सचिनने बंगळुरूला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक साकारून ब्रायन लाराचा एक विक्रम मोडीत काढला. लाराने १९वेळा दीडशेचा टप्पा ओलांडला होता, तर सर डॉन ब्रॅडमन यांनी १८वेळा. सचिनच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा नाबाद २४८. बांगलादेशविरुद्ध ढाक्याच्या बंगबंधू नॅशनल स्टेडियमवर ही शानदार खेळी त्याने साकारून क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले होते. आता शतकांच्या महाशतकाचा एव्हरेस्ट पादाक्रांत करणाऱ्या सचिनच्या खात्यावर जमा आहेत ५१ कसोटी आणि ४९ एकदिवसीय शतके. यात सहा द्विशतकांचाही समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटजगतात द्विशतकी (नाबाद २००) मजल मारणारा सचिन हा पहिला फलंदाज आहे. मग एकदिवसीय क्रिकेटमधील हा सर्वाधिक धावांचा विक्रम वीरेंद्र सेहवागने गेल्या वर्षी मोडला. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक सात शतके झळकावली आहेत ती शारजात. पाकिस्तानविरुद्ध भारताने कमवलेल्या एकदिवसीय सामन्यांमधील विजयांमध्ये सचिनचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रत्ययास येते. परंतु सचिनच्या शतकांच्या बाबतीत मात्र असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. कारण सचिनने पाकिस्तानविरुद्ध पाच शतके झळकावली आहेत. यापैकी चार वेळा भारत पराभूत झाला आहे. अपवाद आहे तो फक्त १९९६मधील एका सामन्याचा.सचिनने आपल्या कारकीर्दीतील ९९वे शतक झळकावले होते ते नागपूरमध्ये यंदाच्याच विश्वचषक स्पध्रेत. परंतु दुर्दैवाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना भारताने गमावला. त्यावेळी सचिन शतक ठोकतो, तेव्हा भारत हरतो.. अशा प्रकारची टीका काही कडव्या समीक्षकांनी केली. परंतु आकडेवारीकडे नजर टाकल्यास यात अजिबात तथ्य नसल्याचे लक्षात येते. उलटपक्षी सचिनचे शतक हे भारताला यशदायी ठरल्याचेच इतिहास सांगतो

वयाच्या १७व्या वर्षी सचिनने आपल्या कारकीर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावले आणि क्रिकेटजगताला आपल्या आगमनाचा इशाराच जणू दिला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतापुढे विजयासाठी आव्हान होते ४०८ धावांचे. परंतु भारताची ५ बाद १२७ अशी घसरगुंडी उडाली. भारताच्या दिग्गज फलंदाजांनी तंबूची वाट धरली होती आणि खेळ संपायला बराच अवधी बाकी होता. परंतु सचिनने जिद्दीने किल्ला लढवला आणि चार तास खेळून काढले. दिवसअखेर सचिनच्या खात्यावर नाबाद ११९ धावा जमा होत्या. या काळात भारताने फक्त एक विकेट गमावली आणि ३४३ धावा उभारल्या. आणखी एका सत्राचा खेळ शिल्लक असता तर भारत जिंकलाच असता. परंतु ती लढत अनिर्णीत राहिली. पराजयाच्या दारातून विजयाच्या उंबरठय़ावर आणणारी ती सचिनची यादगार खेळी मानली जाते. १९९२मध्ये सचिनने सिडनीत दुसरे कसोटी शतक (नाबाद १४८) साकारले. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक नोंदवणारा सचिन सर्वात युवा क्रिकेटपटू यावेळी ठरला. २००१-०२मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. ब्लोमफोटीन येथे पहिल्याच कसोटी सामन्यात भारताची सुरुवातीला ४ बाद ६८ अशी दयनीय अवस्था झाली. शिवसुंदर दास, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली माघारी परतले होते. सचिनने पहिली धाव घेण्यासाठी १७ चेंडू घेतले. पण त्यानंतर त्याने फक्त ९७ चेंडूंत १०१ धावा केल्या. सचिनने १५५ धावांची खेळी साकारली. त्याला यावेळी साथ मिळाली ती वीरेंद्र सेहवागची (१०५). या दोघांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल २२० धावांची भागीदारी केली. पण दुसऱ्या डावात भारताला कुणीच सावरू शकला नाही आणि ही कसोटी गमवावी लागली. २००२ मध्ये हेडिंग्ले येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवण्याचा पराक्रम दाखवला. सचिनची १९३ धावांची खेळी ही लाजवाब होती. परंतु यावेळी राहुल द्रविड (१४८) आणि सौरव गांगुली (१२८) यांनीही शतके झळकावल्यामुळे भारताला इंग्लिश भूमीवर ६२८ धावांचा डोंगर उभारता आला होता.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले आणि एकमेव द्विशतक झळकावण्याचा मानही अर्थात सचिनचाच. २४ फेब्रुवारी २०१० या दिवसाला हा सुवर्णाध्याय लिहिण्याचे भाग्य लाभले. ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिनने १४७ चेंडूंचा सामना करीत २५ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करीत नाबाद २०० धावांची खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर २००४ मध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथी आणि अखेरची कसोटी भारताने जिंकली असती तर मालिकाही २-१ अशी जिंकता आली असती. कांगारूच्या क्षेत्ररक्षकांनी कव्हर ड्राइव्हला सापळाच रचला होता. त्यामुळे सचिनने हा स्ट्रोक एकदाही न खेळता नाबाद २४१ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच भारताला ७ बाद ७०५ (डाव घोषित) धावांचा डोंगर उभारता आला. ३ बाद १९४ अशा सुस्थितीनंतर सचिन आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (१७८) यांनी चौथ्या विकेटसाठी ३५३ धावांची भागीदारी रचली होती. मग दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ४४३ धावांचे आवहान ठेवण्यात आले होते. पण कांगारूंनी ६ बाद ३५७ अशी मजल मारली होती. आणखी एखाद्या सत्रात सामन्याचा निकाल लागला असता. सिडनीतील ही खेळी अविस्मरणीय अशीच होती. ६१३ मिनिटे ४३६ चेंडूंचा मुकाबला करीत ३३ चौकार सचिनने या खेळीत ठोकले होते. ५० षटकांत ३ बाद ४०१ अशी कसोटी क्रिकेटविश्वाला हेवा वाटणारी धावसंख्या भारताने उभारली. मग आफ्रिकेला २४८ धावांत गुंडाळत भारताने हा सामना जिंकला. सचिनची शतके जशी इतिहासाच्या पानोपानी अजरामर झाली आहेत. तसेच त्याची अनेकदा शतके हुकलीही आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘नव्र्हस नाइंटी’चा (९० ते ९९ या धावांदरम्यान) तो चक्क १९ वेळा शिकार झाला आहे. तर ८० ते ८९ या धावांदरम्यान तो १७ वेळा बाद झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ‘नव्र्हस नाइंटी’च्या फेऱ्यात तो नऊ वेळा अडकला आहे. सचिन म्हणजे विक्रमांचा राजा. सामनावीर पुरस्कारालाही त्याने अनेकदा गवसणी घातली आहे. सचिनसारखे क्रिकेटपटू व्हावे, या प्रेरणेने अख्खी पिढीच्या पिढी जन्माला आली आहे. हे देवत्व लाभलेल्या सचिनला १००व्या महाशतकानिमित्त क्रिकेटजगताचा मानाचा मुजरा! अशाप्रकारे सचिन रमेश तेंडुलकर यांनी संपूर्ण आयुष क्रिकेट मध्ये घालवाल आणि देशाच, समाजच नाव उंचावल.

Source : Re – typed article.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा