जन्मतः मिळालेली प्रकृती बदलता येत नाही, हे जरी खर असेल तरी आपल्याला, प्रकृतीच्या अंगभूत समस्या कशाने वाढू शकतात हे लक्षात घेवून त्याप्रमाणे आहारविहारात फरक केलेला बरा. पित्त उष्ण गुणाचं आणि अग्नी महाभूताच! खारट, तिखट आणि आंबट रसात अग्नीच प्राधान्य असत म्हणून हे पदार्थ टाळण चांगल. पित्तप्रकृतीच मुल असेल तर लहानपासुनच हे पदार्थ कमी खायची सवयी लावावी. सहसा होत उलटाच. या मुलांनी गोड खायला मागितलंतरी, ‘मुलांनी जास्त गोड खावू नये, जंत होतील’. अस म्हणून त्याच गोड कमी केल जात. बहुतेकांना तिखट, चमचमीत, मसालेदार पदार्थ आवडतात आणि मग त्याचीच सवय होते. त्यामुळे पित्त दोष वाढतो. म्हणून पित्तप्रकृतीच्या व्यक्तीनी अगदी साय्यमाने असे पदार्थ, आंबट दही, आंबवून केलेले पदार्थ आणि जास्तीच मीठ घेण्याची सवय तोडली पाहिजे. आहारात गोड, तुरट आणि कडू रसाचा समावेश करावा.
पित्तप्रकृतीला भूक सहन होत नाही, हे आपण पाहिलं आहेच म्हणून अशा व्यक्तीनी उपास करू नये आणि उपासाला शेंगदाणे घातलेलेई साबुदाण्याची खिचडी वैगरे खाऊ नये. लंघन केल्यास फलाहार करावा. डाळिंब, द्राक्ष, मोसंबी ही फळ प्रकृत्तीला उत्तम असतात. भूक लागेल त्या त्या वेळी मनुका, बेदाणे, खारीक, खोबर आणि इतर गोड फळ खाल्लेली बरी .
पित्तावर सर्वात श्रेष्ट औषध म्हणजे तूप. लहानपणापासूनच साजूक तूप अशा व्यक्तींच्या आहारात असावं आणि त्याच प्रमाणही चांगल ४–५ चमचे हव. पित्त दोषासाठी शतावरी, अनंतमूळ अशी औषध उपयुक्त असतात. शतावरी आणि अनंतमूळ या पित्तासाठी उपयोगी वनोषाधी आहेत, बऱ्याच वेळा अनंतमूळ चूर्ण अथवा शतावरी चूर्ण आणि त्यासोबत पाव चमचा सुंठ घालून उकळलेले दुध चांगल लागू पडत. अनंतमूळमुले पित्त्प्रकृतीला दुबळी स्थान म्हणजे लहान आतड आणि त्वचा बळकट होतात. गुलकंद, मोरावळा, मध हेही पदार्थ खाण्यात असावेत. दुपारी २ ते ५ हा पित्त वाढण्याचा काळ आहे.
पित्तावर दुसरी उपयुक्त वस्तू म्हणजे दुर्वा. पित्त प्रकृतीत त्वचा नाजूक असते, घाम येतो. म्हणून कपडे आवर्जून कापसाचेच असवेत, अशांना अन्थेतिक कपड्यांचा त्रास होतो. तसेच मालिश करिता नारायण तेल, आवळ्याच तेल, निमतेल वापरावे. पित्ताला उन्हाळा सोसत नाही म्हणून मे आणि ऑक्टोबर हे याचे ‘घात मास’ असतात. विशेषतः ऑक्टोबर या काळात नियमाने वळ्याचे पाणी पिल्यास फायदा होतो. अथवा धने, नगरमोठे घालून उकळलेले पाणी तसाच डोक्याला तेल, तळपायाला तूप चोळल्याने डोकेदुखी, डोळ्यांची आग कमी होते.
पित्त प्रकृती लहानपणीच ओळखता येते केतकी आरक्त वर्णाच, भरपूर तील, तुळशिपान अशा जन्मखुणा असणार, पाळण्यातून काढून पाजेवार्यंत रडून गोंधळ घालणारखूप घाम येणार कुशीवर वळण हे पित्ताच लक्षण आहेत. आपल्या मुलाची, मुलीची प्रकृती अमजूनउमजून उपाय केल्यास मोठेपणी त्याला आणि इतरांना त्यास होणार नाही .
डॉ. शरदिनी डहाणूकर
नागपूर.