पालकांना विनंती

Like Like Love Haha Wow Sad Angry palkan-karita-ek-winanti for my i love my parents, letter for parents, letter to my...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

palkan-karita-ek-winanti for my i love my parents, letter for parents, letter to my parents, my letter to parents, palkanna ek winanti, palkansati patra, write a letter to your …

my parents माझ्याशी ठामपणान वागण्यात कुचराई करू नका. तुमचा ठामपणा  मला हवा आहे. त्यामुळे मला एका प्रकारे सुरक्षित वाटता. वाईट  सवयी हेरण्यासाठी मी सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. मला  वाईट सवई पासून परावृत्त करा. शक्य असेल तर इतर लोकान  समोर माझ्या चुका दाखवू नका. कुणी नसतांना माझ्याशी  एकट्याशी त्या चूकानबद्दल तुम्ही बोललात तर मी त्याकडे  मनापासून लक्ष देईन. माझे अती लाड करू नका. मी जे जे मागेन, ते  सगळ मला मिळाल पाहिजे अस नाही, हे मला अगदीचं माहित आहे.  असे हट्ट तुम्हाला जरास चाचपून पाहण्या करीत असतात. माझे  प्रश्नच बंद करून माझा हिरमोड करू नका. तस झाल तर तुम्हाला  प्रश्न विचारण बंद करून कुठून तरी माझ्या प्रश्नांची उत्तर शोधन मला भाग पडेल.

मला टाकून बोलू नका. नाहीतर मला ऐकूच येत नाही अस दाखवावं लागेल.  मी आहे त्याहून फार लहान आहे अस मला भासवू नका. माझ्या चुका म्हणजे जणू काही फार मोठ पापच असाही मला वाटायला लावू नका. मला वाटणारी भीती हा बावळटपणा आहे अस मला सांगू नका. ती फार खरी असते. तुम्ही ती समजून घ्याल तर मला तुमचा खरच आधार वाटू शकेल.

मी जे करीन त्याच्या परिणामापासून माझ रक्षण करू नका. कधी कधी त्रासदायक अनुभवानमधूनही मला बरच शिकायला मिळत. माझ्या लहानसहान दुखण्यांचा बावू करू नका. त्याच्या निमित्यान तुमच लक्ष माझ्याकडे जरास वेढलगेल तरी पुरे आहे.  विसंगत वागू नका. तुमच्या असंगत वागण्याने माझा पुरता गोंधड उडतो.  तुमच्यावर विश्वास ठेवावा की नाही असा संब्रामाही पडतो.

मला नवनव्या “उचापती” करायला अतिशय आवडत त्याखेरीज जगणंच मला काठीन वाटत. त्यामुळे जमल तर तेवढ चालवून घ्या. तुम्ही अगदी अचूक आणि आदर्श अस मला सांगू नका. कारण तुम्ही तसे नाही हे मला दिसत. त्यावेळी मग मला धसकाच बसतो.  माझ्या वाढीचा झपाटा बराच आहे हे ध्यानात असू  दे. त्या वेगाशी जुळवून घेण तुम्हालाही जरा जडच जात असेल याची मला कल्पना आहे. पण तेवढ जमवून घ्याल ना?
तुम्ही सुधृढ आणि आनंदी असा. मला तुम्ही हवे आहात.

पालकनीतीच्या सौजन्याने.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories