Dudhi Bhoplyachi Dashmi :
For preparing dudhi bhoplyachi dashmi we use the inner portion of dudhi bhopla and mixture of flours, 1 t-spoon oil, ginger paste, sugar, salt and other listed ingredients. This dudhi bhoplyach dashmi looks like a puries. serve this with a chutney.
बनवा दुधी भोपळ्याची दशमी, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेल्या लिस्ट चा वापर दुधी भोपळ्याची दशमी बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परिवाराला खायला दया पौष्टिक अणि दुधी भोपळ्याची दशमी….
साहित्य: पाव किलो दुधी भोपळा, दोन वाटी गव्हाचे पीठ, अर्धा कप ज्वारीचे किंवा बाजरीचे पीठ, अर्धा कप डाळीचे पीठ, थोडे तांदळाचे पीठ, एक चमचा तील, आल – लसूण मिरचीची दोन चमचे पेस्ट, एक चमचा बडीशेप, एक चमचा धने, पाव चमचा ओवा, चवीप्रमाणे साखर, मीठ, एक लिंबू आणि तेल.
कृती:
हा पदार्थ करतांना प्रथम भोपळ्याचे साल काढून किसून घ्यावा. नंतर सर्व पिठ एकत्र करून त्यात तीळ, आल-लसून-मिरचीची पेस्ट टाकावी. बडीशेप, धने आणि ओंवा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा. त्यानंतर हे मिश्रण पिठात घालावे. नंतर साखर, मीठ घालून त्यात लिंबू पिळावा. किसलेला भोपळा या मिश्रणात घालून पिठ पाच मिनिटे मळावे. भोपळ्याला सुटलेल्या पाण्यामुळे पिठाचा गोळा तयार होतो. वेगळे पाणी अजिबात घालू नये. गोळा तयार झाल्यानंतर लगेचच दशमी लाटायला घ्यावी अन्यथा, पिठ सैल होते. मध्यम आचेवर तेल सोडून खमंग दशम्या भाजून घ्याव्या. या दशम्या दहि, लोनी चटनी, लोणचे किंवा स्वासबरोबर खायला घ्याव्यात.
लिखाण :
प्रणाली कालबांडे
pranali_kalbande111@gmail .com
nagpur