गाजर हलवा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Carrot Halwa :

carrot halwa is a classic indian dessert that goes for any celebrative occasion or season. It is made with condensed milk which is easy and quicker method to make the halwa. This one is kids favorite sweet.

Carrot Halwa


साहित्य:
.
अर्धा किलो गाजर, पाव किलो खवा, ३०० ग्राम साखर, वेलचीची पुड, थोड़े साजुक तुप, काजू, बदाम.

कृती :
गाजरे स्वछ धुवून कोरडी करावीत,  धुतलेली गाजरे किसुन घ्यावीत, काढयित थोड़े तुप घेवून गाजराचा किस मंद आचेवर थोडा वेळ परतवून घ्यावा. त्यानंतर त्यात साखर घालावी.  हे मिश्रण थोडा वेळ शिजू द्यावे. वीरघळलेली साखर घट्ट होत आली की त्यात परतलेला खवा घालावा. हे मिश्रण आणखी काही वेळ शिजूद्यावे. त्यानंतर त्यात काजू बदामाचे काप घालावेत. काप घातल्यानंतर झाकण ठेवून मंद ग्यासवर मिश्रण शिजूद्यावे त्यामुळे काजू, बदामाचे कापही शीजल्यासारखे होतात. हलवा करताना सतत ढवळत राहावे. म्हणजे खाली लागत नाही. मिश्रणाचा गोळा चांगला घट्ट झाला, की वरून वेलचीची पूड टाकावी. व्यवस्तीत हलवून दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावा. आदल्या दिवशी करून ठेवल्यास हलवा अधिक चांगला मुरतो.  तर मग नक्की करून बघा तुमचा आवडीचा गाजर हलवा.

लिखाण :
प्रणाली कालबांडे
pranali_kalbande111@gmail .com
nagpur

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu