4
भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मला हसावे लागले !
ठेविले आजन्म डोळे माझे मी कोरडे
आणि दुसर्यांच्या आसवांनी मला भिजावे लागले !
लोक भेटायला आले ते काढत्या पयासवे
आणि शेवटी कुशल माझे मलाच पुसावे लागले !
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कसा होतो मलाही आठवावे लागले ……..
प्रणव वानखेडे
4