1
जयजया जी भक्त राया | जिवलग नामया | आरती ओवाळीता | चित्त पालटे काया ||धृ ||
जन्मता पांडुरंगे जिव्हेवरी लिहिले | अभंग शतकोटी प्रमाण कवित्व रचिले || १||
घ्यावया भक्तीसुख पांडुरंगे अवतार | धरुनिया तीर्थमिषें केला जगाचा उद्धार ||२||
प्रत्यक्ष प्रचीती हे वाळवंट परीस केली | हारपली विषमता द्वैतबुद्धी निरसली ||३||
समाधी माहाद्वारी श्री विठ्ठल चरणी | आरती ओवांळितों परिसा कर जोडूनी ||४||
1