आयुर्वेदिक पुदिना

Like Like Love Haha Wow Sad Angry बाजारात सहज उपलब्ध असणारा पुदिना आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे. काहीसा उग्र असला तरी...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

pudina-menthol useful as medicineबाजारात सहज उपलब्ध असणारा पुदिना आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे. काहीसा उग्र असला तरी पुदिनाचा वास मनाला मोहवतो. पुदिनामुळे पदार्थाला रुची लागत असल्याने गृहिणी स्वयंपाकात त्याचा बराच वापर करतात. हृदयासाठी पुदिना अतिशय चांगला असतो. त्वचेवर, खोकला, उचकी, तपानंतर येणारी दुर्बलता, भूक न लागणे इत्यादी विकारांमध्ये पुदिना गुणकारी ठरतो. पुदिना नेहमी उपलब्ध असला स्वस्त असेल त्या वेळी तो साठवून ठेवता येतो. त्यासाठी पुदिनाचा मुदाकडील भाग काढून टाकावा. उर्वरित भाग चिरून सावलीत वाडवावा. संपूर्ण सुकल्यानंतर कोरड्या बरणीत झाकण लावून भरून ठेवावा. सुकलेला पुदिना चार सहा महिने वापरता येतो. उलट्या होत असल्यास पुदिनाचा चमचाभर रस घ्यावा. उलट्या थांबतात. पुदिना, सैंधव, जिरे, याची  चटणी अपचानावर फार उपयोगी ठरते. अपचानाने वाट साठून पोट दुखत असल्यास, पुदिना आणि आल्याचा रस समप्रमाणात घेवून रुग्णाला द्यावा. प्रसूतीनंतर येणारा ताप आणि पाडीसंबंधीच्या तक्रारीवर पुदिनाचा रस फार उपयोगी ठरतो. पुदिनाचा रस, कांदा आणि लिंबाचा रस हे मिश्रण तीव्र स्वरूपाच्या अतिसारामध्ये उपयोगी ठरते. अशा प्रकारे पुदिना हा फार उपयुक्त आहे. पण गर्भवती स्त्रियांनी आणि आम्लपित्त असणार्यांनी याचा वापर जपून करावा. रोजच्या भाजीत याच्या दोन,तीन पत्ती चा वापर केल्यास जेवणात अन्न पचण्यास चांगला असतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories