मीठही गरजेच
मीठ हा परिचित असलेला एक आवशक घटक आहे.
त्याचा आहारात हमखास उपयोग होतो. मीठशिवाय आमटी, भाजी, बेचव आणि आळनी लागते. हे मीठ अनेक रोगानवर गुणकारी आहे. मिठामुले पाय सुंदर तसेच मुलायम होतात. त्यासाठी गरम पाण्यात थोडेसे मीठ टाकुन त्यात पाय कही वेळ ठेवावे. यामूले पायाची सूज कमी होते. मिठाच्या पाण्याने गुळन्या केल्यास घश्याची खवखव तसेच वेदनाही कमी होतात.
मार लागल्यास किंवा सूज आल्यास मिठाची पूरचुंडीने शेक दिल्यास सूज तसेच ठनका कमी होतो. गरम पाण्यात लासनाचा रस अणि मीठ मिसडून पिल्यास करपट, ढेकर, पोटदुखी, अपचन आदी विकार दूर होतात. जुलाब किंवा उलट्या झाल्यास उकडलेल्या पाण्यात मीठ अणि साखर घालून दिल्यास त्वरित गुण येतो. उचकी लागल्यास सैन्धव मिठाचे पाणी तयार करून नाकात दोन थेंब टाकावेत. याने उचकी तत्काल थांबते. मात्र मिठाचा अतिरेक करू नये. जास्त वापर केल्यास मीठ हानिकारक सुद्धा होवू शकते.