कृष्णाच्या राधे सारखं !
प्रेम कर
पहाटेस जागवणार्या..
गोड भूपाळी सारखं !
प्रेम कर
मन धुंद करणार्या…
मोगर्याच्या फुलासारखं !
प्रेम कर
मनात रुणझुणणार्या..
नादमधुर घुंगरासारखं !
प्रेम कर
मायाळू मातेच्या…
प्रेमळ वात्सल्ल्यासारखं !
प्रेम कर
वरून कठोर पण…
अंतर्यामी हळव्या पित्यासारखं !
प्रेम कर
पावसाच्या सरीनंतर…
येणार्या मातीच्या सुवासासारखं !
प्रेम कर
मन उल्हासवून …
भिजविणार्या श्रावण सरींसारखं !
प्रेम कर
मेघ पाहून …
उत्स्फूर्त नाचणार्या मोरासारखं !
प्रेम कर
कृष्णाच्या भक्तिस्तव
विष प्राश्णार्या मीरेसारखं !
प्रेम कर
कृष्णाच्या राधेसारखं…
दोन जीव एक प्राणांसारखं !!