friends-group Share & Show your Photos to Friends & Favorites securely and privately ..
मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात
मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात..
… कुणी ‘g+’ वर तर कुणी ‘Facebook’ वर जमतात..
प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय ‘chat’ वरच संपलेले असतात….. …
मग ‘chat’ वरच भेटू ” याचं Promise होतं..
आणि संभाषणातून ‘Sign out’ केलं जातं. ..
‘लाल’ ‘हिरव्या ‘ दिव्यांच्या गर्दित मन हरवून जातो…
घट्ट पकडलेला हात सुद्धा सैल सुटून जातो…
‘Available’ आणि ‘Busy’ मध्ये
प्रत्येकाचा status घुटमळत राहतो.
..
आपणहून add केलेल्या मित्रपासून लपण्याकरिता
‘Invisible’ चा आडोसा घेतला जातो..
ताप आल्याचं आज-काल आईच्या आधी ‘Facebook’ ला कळतं…
औषधा पेक्षा ‘Take Care’ च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..
मनातलं सगळं ‘Facebook’ वर बोलायची
गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
‘Net’ ची जाळीच का असावी?
कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
‘chat’ ला गप्पांनी आणि ‘Smile’ ना हास्यानी replace करावं..
शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
नात्याचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं….
चला तर पूर्वीचे दिवस पुन्हा अनुभवुया ,
नात्याला technology पासून जपून ठेवुया …….
(¯`v´¯)
.`•.¸.•´
¸.•´.•´¨) ¸.•¨)
(¸.•´(¸.•´ (¸.•¨¯`* ♥ ♥~~अल्पशः अलिप्त
4 Comments. Leave new
facebook var jar aapan aagrah kela tar aapan bhetu shakato ani te divas punha aanu shakato
you are absolutely right sir….
kharach te diwas ata harawalet.
ajkal facebook ani orkut mule mitrachya gappa band zaly ahet.
purwichi ti toli…ani tawalkya marnari ti mule ajj online astat…..